चिपळूणमधील चार प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत सादरीकरण; सोमवारी नागरिकांशी संवाद

चिपळूण :* शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस, चिंचनाका ते नगर पालिका, चिंचनाका ते बहादूरशेख नाका आणि मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड बावशेवाडी या चार प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत सल्लागार श्री. देशपांडे यांनी शुक्रवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर व सर्व नगरसेवकांसमोर सविस्तर माहिती सादर केली.या सादरीकरणावेळी रस्त्यांची एकूण रुंदी, डिव्हायडरची मांडणी, डांबरी रस्त्याची रुंदी, पेव्हर ब्लॉकची जागा, गटारांची व्यवस्था, तसेच फुटपाथची रचना कशी असणार, याबाबत एलईडीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.याबाबतची पुढील माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे या चारही मार्गांवर बाधित होणारे नागरिक, व्यावसायिक आणि इतर नागरिकांसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत एलईडीद्वारे संपूर्ण आराखडा दाखवून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.या सादरीकरणानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. चिंचनाका येथे मार्किंग करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत पाहणी करण्यात आली. तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या भागातही भूमापन करणारे अधिकारी, नगर पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी केली.या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, भूसंपादन विभागाचे ओंकार सकपाळ, बांधकाम मिस्त्री रविकांत सातपुते, अभियंता श्री. डफळ, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव, तसेच रचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या वेळी नगरसेवक उदय जुवळे, रुपाली दांडेकर, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, वैशाली कदम, निहार कोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, अंकुश आवले, उमा उर्फ शिल्पा देसाई, शुभम पिसे, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे आणि मिथिलेश (विकी) नरळकर उपस्थित होते..

चार प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत सादरीकरण; सोमवारी नागरिकांशी संवाद

चिपळूण : शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस, चिंचनाका ते नगर पालिका, चिंचनाका ते बहादूरशेख नाका आणि मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड बावशेवाडी या चार प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत सल्लागार श्री. देशपांडे यांनी शुक्रवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर व सर्व नगरसेवकांसमोर सविस्तर माहिती सादर केली.

या सादरीकरणावेळी रस्त्यांची एकूण रुंदी, डिव्हायडरची मांडणी, डांबरी रस्त्याची रुंदी, पेव्हर ब्लॉकची जागा, गटारांची व्यवस्था, तसेच फुटपाथची रचना कशी असणार, याबाबत एलईडीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.

याबाबतची पुढील माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे या चारही मार्गांवर बाधित होणारे नागरिक, व्यावसायिक आणि इतर नागरिकांसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत एलईडीद्वारे संपूर्ण आराखडा दाखवून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

या सादरीकरणानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. चिंचनाका येथे मार्किंग करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत पाहणी करण्यात आली. तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या भागातही भूमापन करणारे अधिकारी, नगर पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी केली.

या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, भूसंपादन विभागाचे ओंकार सकपाळ, बांधकाम मिस्त्री रविकांत सातपुते, अभियंता श्री. डफळ, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव, तसेच रचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी नगरसेवक उदय जुवळे, रुपाली दांडेकर, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, वैशाली कदम, निहार कोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, अंकुश आवले, उमा उर्फ शिल्पा देसाई, शुभम पिसे, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे आणि मिथिलेश (विकी) नरळकर उपस्थित होते.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button