
पालकमंत्री डॉ. उदय सामंत रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
रत्नागिरी, दि. १४ ) – राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे –
रविवार, दि. १५ नोव्हेंबर सकाळी ६ वा.: लांजा तालुक्यातील मौजे शिपोशी येथील श्री गंगेश्वर मंदिर पटांगणात आयोजित “सह्याद्री हिल्स मॅरेथॉन, २०२६” च्या “फ्लॅग ऑफ” सोहळ्याला ते उपस्थित राहतील.
सकाळी ८.३० ते १०.३० वा.: पाली (ता. जि. रत्नागिरी) येथे वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.
सकाळी ११ वा.: रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मी चौक (गाडीतळ) ते मारुती आळी रस्ता रुंदीकरण कामाची ते पाहणी करतील. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- दुपारी १.३० ते ३.३० वा.: जयस्तंभ, रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव आहे.
सायंकाळी ५ वा.: राजिवडा, रत्नागिरी येथील श्री स्वयंभू काशि विश्वेश्वर देवस्थानात नव्याने बांधलेल्या भक्त निवास व सभागृहाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी ६.३० वा.: उद्यमनगर येथील चंपक मैदानावर रत्नागिरी महोत्सव ग्रुप आणि रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ आणि लोकार्पण सोहळ्याला ते प्रमुख उपस्थिती लावतील.
सायंकाळी ७ वाजता मोटारीने कणकवली (जि. सिंधुदुर्ग) कडे प्रयाण करणार आहेत.




