‘दर्याभवानी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्तमेढीचा ऐतिहासिक प्रसंग चित्रित.
पूर्णगड येथे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी कोकणी पद्धतीने घातले सागराला गाऱ्हाणे.
रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य पूर्णगड येथे ‘दर्याभवानी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सिंधुदुर्ग किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा ऐतिहासिक प्रसंग चित्रित करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण करण्याचा प्रसंग साकारण्यात आला.
या चित्रीकरणादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खास कोकणी शैलीत सागराला गाऱ्हाणे घातले. कोकणातील पारंपरिक संस्कृती, सागरी परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याचा संगम या प्रसंगातून अनुभवायला मिळाला.
या चित्रीकरणामुळे पूर्णगडच्या भूमीत शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग पुन्हा जिवंत झाल्याचे पाहायला मिळाले.



