
महाराष्ट्रात दूध ४ रुपयांनी महागणार; गोकुळ, चितळेसह प्रमुख ब्रँड्सचे नवे दर सोमवारपासून लागू
कोल्हापूर- दिवाळीनंतर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. राज्यातील दूध उत्पादक संघांनी गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून या नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले या बैठकीला ४५ दूध संघांचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते. अमूलने नुकतीच दरवाढ केल्यानंतर आता महाराष्ट्रातही गोकुळ, चितळे, कात्रज आणि सोनाई यांसारख्या प्रमुख ब्रँड्सचे दूध ४ रुपयांनी महागणार आहे.
यासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्येही १०%




