आपल्याशी संपर्क साधल्यास  अधिकची माहित घेवून याेग्य ती कारवाई करणे साेपे हाेईल, उद्याेगमंत्री उदय सामंत


खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाैकशीचा अहवाल 2 दिवसात येईल. त्यामध्ये जर कंपनी हानीकारक असल्याचे स्पष्ट झाले तर बंदची कारवाई केली जाईल, असा थेट इशारा उद्याेगमंत्री उदय सामंत यानी बुधवारी कळवंडे येथे पत्रकारांशी बाेलताना दिला. दरम्यान गुरूवारी कंपनीविराेधात हाेणाèया आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर बाेलताना आंदाेलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्यास  अधिकची माहित घेवून याेग्य ती कारवाई करणे साेपे हाेईल, असेही ते म्हणाले.
इटलीमध्ये प्रदूषणामुळे हजाराे लाेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली व साडेतीन लाभ लाेकांना अनेक राेगांनी बाधित केलेली मिटेनी कंपनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल या नावाने लाेटे परशुराम येथे कार्यरत झाली आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे बाधित हाेणार असल्याचा आराेप करीत ही कंपनी तातडीने बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी संघर्ष समितीने 8 राेजी आंदाेलन केले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आंदाेलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत मला काहीही बाेलायचे नाही. मात्र आंदाेलकांनी उद्याेगमंत्री म्हणून माझ्याशी चर्चा केली असती तर मलाही काही गाेष्टी त्यांच्याकडून समजल्या असत्या मात्र तसे झाले नाही. तरीही मी त्यांना भेटणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button