महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश



रत्नागिरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान जाकादेवी-खालगाव येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खालगावचे उपसरपंच कैलास दत्ताराम खेडेकर आणि शाखाप्रमुख वैभव प्रकाश गोताड यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे, सरचिटणीस संकेत कदम, राकेश नंदकुमार खेऊर, ऋषिकेश (बंटी) सुर्वे, रोहित कोळवणकर, अनंत खापले, गौरव पटेल तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button