
पालकमंत्री डॉ. उदय सामंत गुरुवारी दौऱ्यावर;नूतन ‘जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा
रत्नागिरी, दि. ४ ): महाराष्ट्राचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे उद्या गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दुपारी २ वाजता: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रत्नागिरी येथे गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती.
दुपारी ३ वाजता: माळनाका येथील विभागीय कार्यालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नूतन ‘जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा.
सायंकाळी ४ वाजता: गाडीतळ येथील श्री पतितपावन मंदिर संस्था येथे मंदिर परिसर विकासकामांसंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थिती.
सायंकाळी ५ वाजता: स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे नवनिर्वाचित विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) यांच्या प्रशिक्षण शिबीर व सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती.
दिवसभरातील विविध कार्यक्रम व बैठकांनंतर, रात्री ११:३० वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील.




