
लवेल येथील २३ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण ?
खेड : – तालुक्यातील लवेल बौद्धवाडी येथील २३ वर्षीय विवाहित महिला सौ. प्रणाली आदर्श गमरे हिचे अपहरण करण्यात आले असल्याची शक्यता गृहीत धरून येथील पोलीस स्थानकात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना सोमवार दि. ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता लवेल पेट्रोल पंपासमोरील बस थांब्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार., या विवाहित महिलेला तिचा पती फिर्यादी आदर्श प्रदिप गमरे ( वय २४ ) याने लवेल बौद्धवाडी ता. खेड येथील बस स्टाॅपवर महाड गंधारपाले जि. रायगड येथील आपल्या माहेरी जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये बसविले. पण हि विवाहित महिला आपल्या माहेरी (घरी) सायंकाळपर्यंत पोहोचलीच नाही म्हणून, तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही, म्हणून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 351/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 140(3) अन्वये अज्ञात व्यक्तिच्या विरोधात पती आदर्श प्रदिप गमरे याने येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



