एसटी बसवरील नियंत्रण सुटल्याने कुडली-चिपळूण-गुहागर गाडीचा अपघात

गुहागर : मेनलीप आणि कवर लीप तुटून बसवरील नियंत्रण सुटल्याने कुडली-चिपळूण-गुहागर एसटी गाडीला गुहागर तालुक्यातील शीर आंबेकर वाडी धारेवरची वाडीजवळ अपघात घडला. नशीब बलवत्तर म्हणून या गाडीतून कुडली, पडवे, गुहागर येथून प्रवास करणारे प्रवासी बचावले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर आगाराची ही एसटी(क्र. एमएच-१४-बीटी-२७६५) बसचालक जी. पी. दोडके चालवत होते. ही गाडी कुडली येथून वस्तीवरून आबलोली, शृंगारतळी मार्गे चिपळूणला जात असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शीर येथे आंबेकर वाडी, धारेवरची वाडी जवळ आली असता गाडीचे मेनलीप आणि कवर लीप तुटले. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
या गाडीतून पडवे येथील तायरा जांभारकर, कुडली येथील अमृता वासावे यांना जास्त दुखापत झाली असून, भाग्यश्री हरचकर, प्रतिभा हरचकर, दर्शना पावरी, साधना पवार (रा. कुडली) सुभाष राठोड, गणेश दोडके (रा. गुहागर), सुनीता सुर्वे (शिवणे) यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताचा एसटी महामंडळाच्या वतीने अपघात स्थळी एटीएस सुनील पवार, एडब्ल्यूएस मंदार कदम आणि आणि टीमने पंचनामा केला असून गाडीचा मेन लीप आणि कव्हर लीप तुटल्यानेच आणि ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. सर्व जखमींवरती प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे डॉ. प्रशिक पांडे, डॉ. तेजल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून सर्व जखमींना घरी पाठवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button