
रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीला लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात;कोट्यावधी रुपयांचे नुकसान
रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे…. रत्नागिरी टेक्नो सर्विसेस कंपनीला काल रात्री आग लागून कंपनी बेचिराख झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मालक मनिष आपटे यांच्यासमोर या अग्नीतांडवामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे

तालुक्यातील 4 ते 5 ग्रामपंचायतीच्या कचऱ्याचे होत होते वर्गीकरण
दोन बेलिंग मशीन सहित, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीची मशिनरी , शेड आणि वर्गीकरण केलेला आणि बेलिंग करून मोठी बंडल बांधून ठेवलेल्या लाखो रुपयांचे नुकसान…..
आगीचे कारण समजू शकले नाही
या कंपनीमध्ये कंपोस्ट युनिट (कचऱ्यापासून खत निर्मितीची युनिट मशीन) बायो गॅस, श्रेडर आदी मशीन ची निर्मिती ही केली जात होती.
या निर्मिती करणाऱ्या मालाचे सुट्या भागांचे ही मोठे नुकसान झाले आहे
रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे…. रत्नागिरी टेक्नो सर्विसेस कंपनीला काल रात्री आग लागून कंपनी बेचिराख झाली आहे




