रेल्वेस्टेशन परिसरातून दुचाकी चोरीला


रत्नागिरी : कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात गिरीरत्न हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत घडली. सौरभ सचिन पिलणकर (वय २५, रा. सावली बंगलो, कुवारबाव) यांनी आपली दुचाकी गिरीरत्न हॉटेलसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याबाबत पिलणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button