माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक


रत्नागिरी, दि. २५ ): माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे ही बैठक पार पडणार आहे.
जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांना आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासंदर्भात काही तक्रारी किंवा अडचणी असतील, त्यांनी या बैठकीस उपस्थित राहून त्या मांडाव्यात. संबंधित तक्रारदारांनी आपला लेखी अर्ज आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत घेऊन विहित वेळेत बैठकीला हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button