दापोली-हणz रस्त्याची दयनीय अवस्था

दापोलीः- दापोली-हर्णे रस्ता सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पर्यटन रस्ता म्हणून प्रसिध्द असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, प्रवास करणे म्हणजे कंबरदुखी, पाठदुखी आणि हाडे खिळखिळी करून घेण्यासारखे झाले आहे.
दररोज या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, शाळकरी, विद्यार्थी, रूग्ण आणि नागरिक प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत. तरीही याकडे कोणाचेही लक्ष नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधीही शांत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सध्या निधी नाही, असे कारण दरवेळी दिले जाते, पण निधी मिळेपर्यंत हा पर्यटन रस्ता पूर्णपणे कोमात जाणार अशी भीती व्यक्त होत आहे. त्रास सहन करायला जनता सक्षम आहेच, अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
फोटो डिपी 25-02 दापोली-हर्णै रस्त्याची झालेली दयनीय अवस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button