
अपघातानंतर पलायन करणाऱ्या ग्रेडर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. टीआरपी येथे सायकल ला ग्रेडरची धडक; वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी, ता. २५ : अविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेसमोर टीआरपी मुख्य रस्त्यावर ग्रेडरने सायकला पाठीमागून धडक दिल्याने रघुनाथ बाबू झोरे (५०) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या ग्रेडर चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश कुमार मांझी (२७, मूळ रा. दिनापट्टी, जि. शिवाल, बिहार; सध्या रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ झोरे हे मारुती मंदिर ते खेडशी या दिशेने दुचाकीवरून जात होते. टीआरपी येथे आले असता, ग्रेडर (एमएच ०८ बीसी ६५३०) चालक मांझी याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात झोरे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी अरुण बाबू झोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




