
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या मंडणगड शहराध्यक्षपदी मतीन टेमकर यांची नियुक्ती
खेड : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या मंडणगड शहराध्यक्षपदी मतीन इस्माईल टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली. खेड नगरपालिका येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मंडणगड तालुकाध्यक्ष अस्फान खलफे, महेश कंचावडे तसेच भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर उपस्थित मान्यवरांनी मतीन टेमकर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंडणगड शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि आगामी उपक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या मतीन टेमकर यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत मंडणगड शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




