
जिल्हा परिषदेची खास सभा ४ नोव्हेंबर रोजी
रत्नागिरी ) :- जिल्हा परिषदेची खास सभा ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता हिंदुह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. असे अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि सचिव विजयसिंह जाधव यांनी कळविले आहे.
गण संख्येअभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तास थांबून त्याच ठिकाणी सभा घेण्यात येईल किंवा अध्यक्ष निश्चित करतील त्या तारखेस व त्यावेळेस आयोजित करण्यात येईल असेही सभेच्या नोटीसीत म्हटले आहे.




