
निधी असूनही रत्नागिरी जिल्ह्याला अत्यल्प औषध पुरवठा, आराेग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर
राज्य आराेग्य शासनाकडून विभागासाठी काेट्यवधी रुपयांची भरीव तरतूद हाेत असतानाही, प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्याला अत्यल्प औषध पुरवठा हाेत असल्याचा गंभीर प्रकार समाेर आला आहे. कागदावर भरीव तरतूद आणि प्रत्यक्षात त्रुटीपूर्ण कारभार यामुळे जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणेचा कारभार वाèयावर असल्याचे स्पष्ट हाेते.
एकही रुग्ण औषधांविना राहू नये असा शासनाचा उद्देश असताना, रत्नागिरी जिल्ह्यात औषधांचा तुटवडा कायम आहे. ही बिकट परिस्थिती पाहाता पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांच्या निधीतून 9 ते 10 काेटी रुपये आराेग्य यंत्रणेला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, राज्य शासनाचा निधी असतानाही ताे खर्च न करता अखर्चित ठेवण्याचे काम आराेग्य विभागाकडून सुरू असल्याचा आराेप हाेत आहे.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांना आपत्कालीन खर्चासाठी अवधी दीड लाखांची, तर ग्रामीण रुग्णालयांना केवळ 35 हजार रुपयांची तरतूद कागदाेपत्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा अल्प निधीही शासनाकडून अद्याप प्रत्यक्षात मिळालेला नाही. त्यातच क्षयराेग कार्यक्रमासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असताना, आराेग्य विभागाने चक्क जिल्हाधिकाèयांना पत्र पाठवून जिल्हा स्तरावरून 15 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.




