लांजा तालुक्यात जलसंधारणाचा उपक्रम; डाफळेवाडीत ४० फूट बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश

लांजा: तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी लांजा डाफळेवाडी येथे नदीवर आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून वनपरिमंडळ व शेतकरी लाकूड व्यापारी संघटना लांजा यांच्या संयुक्त सहभागातून बंधारा बांधण्यात आला.

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी लांजा शहरानजीक डाफळेवाडीत शासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या समन्वयातून ४० फूट बंधारा बांधण्यात आला. तर या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या बंधाऱ्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे भूजलसाठा वाढण्यास मदत होणार असून पाणीटंचाईच्या काळात त्याचा फायदा होऊ शकतो. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा लोकसहभागातून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या उपक्रमावेळी लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, नगराध्यक्ष सावली कुरूप, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर, वनपाल धुळू कोळेकर, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वनअधिकारी सोहेल शेख यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच लांजा शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारूख नेवरेकर, रामचंद्र झोरे, नाजिम नेवरेकर, यशवंत घडशी, संतोष रामाणे, सुभाष लाखण, आजू बागाव, महेंद्र कांबळे, राजाराम माने, सुरेश शिंदे, प्रकाश गुरव, बाबू खानविलकर, बंडू माने, संजय पीलके, अरुण जोशी, संतोष विचारे, पांडुरंग कोलापटे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button