लांजा येथे गांजासदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना तरुण आढळला; पोलिसांत गुन्हा दाखल

लांजा: झाडाझुडपाच्या आडोशाला बसून बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या ४० वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सायांकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास लांजा गोंडेसकळ रोड सड्यावर येथील जंगलमय भागात घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल मदन होलम (वय ४० राहणार लांजा एसटी स्टँड जवळ) हा दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास लांजा गोंडेसकळ रोड सड्यावर येथील जंगलमय भागात जंगली झाडाझुडपाच्या आडोशाला गांजासदृश्य अमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला होता. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांनी दिली होती.

याप्रकरणी कुणाल मदन होलम याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button