
काेकण रेल्वेमार्गावरून धावणारी जबलपूर-काेईमतूर धावणार नियमित
काेकण रेल्वेमार्गावरून धावणारी जबलपूर-काेईमतूर साप्ताहिक स्पेशल आता नियमितपणे धावणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या साेयीसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
20160/20159 क्रमांकाची जबलपूर-काेईमतूर साप्ताहिक स्पेशल प्रत्येक शुक्रवारी रात्री 11.50 वाजता जबलपूरहून सुटते. परतीच्या प्रवासात काेईमतूर येथून प्रत्येक साेमवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सुटते. 24 डब्यांच्या स्पेशलला काेकण मार्गावर राेहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव आदी स्थानकात थांबे आहेत.
ही साप्ताहिक गाडी नियमित झाल्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून काेकण किनारपट्टीवर तसेच दक्षिण भारतात प्रवास करणाèया प्रवाशांना विशेषतः पर्यटकांना माेठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच ही गाडी नियमित झाल्यामुळे अतिरिक्त शुल्कापासूनही प्रवाशांची सुटका झाली आहे.




