
जिल्हा शासकीय रुग्णालयातील महत्त्वाचे अॅेरेसिस मशिन बंद, पालकमंत्र्यांकडून दखल
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ माेठ्या प्रमाणावर पसरली असून रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण वेगाने घटत आहे. अशा गंभीर परिस्थितीत डेंग्यूबाधित रुग्णांच्या जीवाला माेठा धाेका निर्माण झाला आहे. एकीकडे आराेग्य आणीबाणीची परिस्थिती असताना, दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयातील महत्त्वाचे अॅेरेसिस मशिन बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले हाेते. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री डाॅ. उदय सामंत यांनी ढिसाळ कारभार करणाèया आराेग्य यंत्रणेचे कान उपटत, हे मशिन तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
काेराेनाच्या खडतर काळात पालकमंत्री में उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा नियाेजन निधीतून सुमारे 40 लाख रुपये खर्च
करून हे अत्याधुनिक मशिन खरेदी करण्यात आले हाेते. काेराेना काळात या मशिनचा रुग्णांना माेठा आधार मिळाला. मात्र, त्यानंतरच्या काळात आराेग्य प्रशासनाने दाखविलेल्या कमालीच्या दुर्लक्षपणामुळे हे मशिन नादुरुस्त हाेऊन धूळ खात पडले.
या निष्काळजीपणामुळे स्थानिक पातळीवर प्लेटलेट उपलब्ध न झाल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना काेल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईसारख्या दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागत हाेती. या मशिनद्वारे मिळणारे प्लेटलेट किट सुमारे 5 दिवस वापरता येते आणि त्याची मूळ किंमत 9 हजार रुपयांच्या आसपास असते. मात्र, परजिल्ह्यातून हेच किट तातडीने मागविण्यासाठी सामान्य रुग्णांच्या कुटुंबाला 40 ते 50 हजार रुपयांचा प्रचंड आर्थिक फटका बसत हाेता. ही परिस्थिती गाेरगरीब रुग्णांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरत हाेती.
स्थानिक पातळीवर मशिन उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे रुग्णांना साेसावा लागणारा हा नाहक आर्थिक व मानसिक त्रास लक्षात येताच डाॅ. उदय सामंत यांनी तातडीने चक्रे हलविली. त्यांनी आराेग्य यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेत मुंबईहून तज्ज्ञ टेक्निशियन्सना बाेलाविले आहे. येत्या दाेन दिवसात हे टेक्निशियन रत्नागिरीत दाखल हाेऊन मशिन दुरुस्त करतील. यामुळे डेंग्यूच्या या संकटात सर्वसामान्य रत्नागिरीकरांना माेठा दिलासा मिळणार असून, वेळेवर आणि रास्त दरात प्लेटलेट मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.




