
उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जणांचा मृत्यू!
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली असून, बद्रीनाथ धामहून प्रवाशांना घेऊन फाटा येथे निघालेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ मंदिरावरून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.
टिव्ही 9ने दिलेल्या वृत्तानुसार, बद्रीनाथ तीर्थयात्रेवरून परतणारे हे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसराजवळ अचानक रडारवरून बेपत्ता झाले होते. जोशीमठच्या मारवाडी भागाजवळील चाय गावाच्या टेकडीजवळ या हेलिकॉप्टरचा संपर्क पूर्णपणे तुटला. सुरुवातीला हेलिकॉप्टर केवळ बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र प्रशासनाकडून तात्काळ राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान ते दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळल्याचे निष्पन्न झाले.
हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ मंदिरावरून दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.
टिव्ही 9ने दिलेल्या वृत्तानुसार, बद्रीनाथ तीर्थयात्रेवरून परतणारे हे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसराजवळ अचानक रडारवरून बेपत्ता झाले होते. जोशीमठच्या मारवाडी भागाजवळील चाय गावाच्या टेकडीजवळ या हेलिकॉप्टरचा संपर्क पूर्णपणे तुटला. सुरुवातीला हेलिकॉप्टर केवळ बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र प्रशासनाकडून तात्काळ राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान ते दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळल्याचे निष्पन्न झाले.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे एक पथक आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. चमोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक प्रकाश यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून, दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे चारित्र्य आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




