पावसाचे संकेत देणारा ‌’इंडियन पिट्टा‌’ रायगडमध्ये


मान्सूनपूर्व काळात पावसाचे संकेत देणारा प्रसिद्ध ‌’इंडियन पिट्टा‌’ अर्थात नवरंग पक्षी कर्नाळा परिसरात दाखल झाला आहे. नवरंगच्या आगमनामुळे निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.रंगीबेरंगी पिसे आणि मधुर आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस कर्नाळा जंगल परिसरात दिसून येतो. यंदाही त्याचे आगमन झाल्याने पावसाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.पनवेल येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षक माधव आठवले तसेच पक्षी अभ्यासक समाधान पवार यांनी कर्नाळा परिसरात इंडियन पिट्टाचे निरीक्षण केले असून गेल्या काही दिवसांपासून पहाटे व संध्याकाळच्या वेळेत त्याचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button