हर्णेच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘बॉम्बे डोरिड स्लग’ या अत्यंत दुर्मिळ सागरी जीवाची पहिलीच नोंद,


दापोली तालुक्यातील हर्णेच्या समुद्रकिनारीही अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण आणि रंगीबेरंगी सागरी जीवाची नोंद झाली
बॉम्बे डोरिड स्लग’ (Goniobranchus bombayanus) हा सागरी अपृष्ठवंशी जीव हर्णे येथील खडकाळ किनारपट्टीवर आढळून आला असून, हर्णे किनारपट्टीवरील त्याची ही पहिली नोंद असल्याचे समुद्री जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार यांनी सांगितले.

फहाद जमादार (JNK Marine Aqua Life) हे १७ ऑक्टोबरच्या रात्री हर्णे किनारपट्टीवरील खडकाळ भागात नियमित समुद्री जैवविविधता निरीक्षण करत असताना त्यांना हा वैशिष्ट्यपूर्ण जीव आढळला. त्याचे छायाचित्रण करून त्याची नोंद करण्यात आली. हर्णे परिसरातील खडकाळ किनारे, भरती-ओहोटीचा पट्टा आणि त्यातील सूक्ष्म अधिवास विविध प्रकारच्या सागरी जीवांसाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे या नोंदीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.बॉम्बे डोरिड स्लग’ हा ‘न्युडिब्रँक’ या कवचविरहित सागरी गोगलगायींच्या समूहातील रंगीबेरंगी जीव आहे. त्याचे वैज्ञानिक नाव Goniobranchus bombayanus असे आहे. उपलब्ध माहितीनुसार, या जीवाची पहिली नोंद १९४६ मध्ये तत्कालीन बॉम्बे अर्थात मुंबईतील कुलाबा किनारपट्टीवर झाली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button