चिपळूण येथील धनश्री श्रीनिवास गोखले यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीनगर ते लेह ५०० किमीची सायकल सफर

खडपोलीच्या धनश्री गोखलेंचा थरारक प्रवास


रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला म्हणून गौरविल्या गेलेल्या खडपोली, चिपळूण येथील धनश्री श्रीनिवास गोखले यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीनगर ते लेह हा ५०० किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
गृहिणी असलेल्या धनश्री यांनी पती श्रीनिवास गोखले यांच्या प्रोत्साहनाने सायकल चालविण्यास सुरुवात केली. प्रकारातील २००, ३००, ४०० आणि ६०० किमीचे टप्पे पूर्ण करून त्यांनी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवले आहे. त्यांच्या यशामुळे चिपळूण परिसरात अनेक महिला रायडर्स तयार झाल्या आहेत.
समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर विरळ ऑक्सिजन या संस्थेमार्फत आणि बदलत्या हवामानात सायकल चालविणे हे मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी नियोजन केले होते. ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान पुणे, गुजरात, चेन्नई, जम्मू आणि चिली येथील ७ रायडर्सच्या ग्रुपसोबत त्यांनी हा प्रवास केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button