गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदवी कीर हिची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक हिंदवी किर (प्रथम वर्ष कला) हिची निवड भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने हरियाणासाठी आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झाली. येत्या १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत कुरुक्षेत्र, हरियाणा येथे शिबीर होणार आहे.

विविध राज्यांमधील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट व्हावी आणि तरुणांमध्ये देशभक्ती व बंधुभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरासाठी देशभरातून मोजक्याच गुणवान स्वयंसेवकांची निवड करण्यात येते. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या या स्वयंसेवकाने आपल्या उत्कृष्ट सामाजिक कार्य, नेतृत्वगुण आणि शिबिराच्या पूर्वतयारीमधील सहभाग यामुळे तिची निवड सदर शिबिरासाठी झाली आहे. या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रासेयो विभागाचे समन्वयक, प्राध्यापक, सहकाऱ्यांनी अभिनंदन करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button