चिपळूण उड्डाणपुलासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार

माणगाव बायपाससाठी जानेवारीची डेड लाईन. इंदापूर बायपास मे अखेर पर्यंत पूर्ण होणार

रत्नागिरी

कळीचा मुद्दा ठरलेला मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव बायपास येत्या नवीन वर्षात जानेवारी अखेरपर्यंत सुरू होणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील बहादूर शेख नाका उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू असून 30 नोव्हेंबर पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणाऱ्या प्रवासी पर्यटक व कोकणवासीयांना शिंमगोत्सवापूर्वीच काहीसा दिलासा मिळणार आहे. माणगाव बायपासच्या पूर्णत्वानंतर इंदापूर बायपासच्या कामालाही जानेवारी महिन्यात गती मिळणार आहे. जानेवारी महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर मेगा ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता आहे. इंदापूर बायपासचे काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकण रेल्वे ट्रॅक करून जाणाऱ्या माणगाव बायपासवरील उड्डाणपुलासाठी कोकण रेल्वे प्रशासनातील यांत्रिकी अभियत्यांची टीम व  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता आवश्यक मशिनरी, क्रेन अशी सारी सज्ज ठेवून काम गतीने सुरू आहे.

गेले कित्येक महिने रखडलेल्या चिपळूण उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव व मुख्य अभियंता वृषाली पाटील संबंधित ठेकेदार कंपनी यांची यंत्रणा आपुल याच महिन्यात अखेरपर्यंत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.   बहादुरशेख नाका उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी कोसळला होता व सुदैवाने जीवितहानी टाळली होती. नव्याने डिझाईन तयार करून बांधण्यात आलेला हा पूल सुरू झाल्यास चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाचे काम पूर्ण आल्यानंतर याच पुलाचा मार्ग पुढे थेट कापसाळापर्यंत वाढवणेत यावा अशी स्थानिक नागरिकांची मोठी मागणी आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रलंबित प्रस्तावाला बहादुरशेख नाका उड्डाणपुलाच्या पुलाच्या पूर्णत्वानंतरच गती मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

बायपास मार्ग व महामार्गाच्या पूर्णत्वासाठी कोकणातील चाकरमान्यांनी स्थापन केलेल्या जन आक्रोश समितीने देखील अनेक वेळा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री व अनेक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

माणगाव बायपासच्या रेल्वे उड्डाण पुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण पूर्ण होऊन हा बायपास पूर्ण झाल्यानंतर या उड्डाण पुलावरील वाहनाच्या क्षमतेची चाचणी होण्यासाठी किमान दोन महिने कालावधी लागणार आहे व त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच माणगाव बायपासवरील वाहतूक नवीन वर्षात जानेवारी अखेरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button