लांजा वेरवली वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी प्रमोद खेडेकर यांना 7 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

लांजा: वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी रामगाव परिसरात वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रमोद खेडेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील वेरवली बुद्रुक लाडवाडी रामगाव येथे १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघडीस आले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली होती. यापूर्वी २७ ऑक्टोबर पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तपासासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेल्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या असा सुमारे १२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल एका फायनान्स कंपनी मधून हस्तगत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button