
महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सला अधिक सक्षम करणार – मंत्री योगेश कदम
ड्रग्ज तस्करांच्या रॅकेटवर लक्ष केंद्रित; टास्क फोर्सच्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतली पहिली भेट
खेड : महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असून, त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सला अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. या टास्क फोर्सला आवश्यक ते पाठबळ देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या जातील. तसेच त्यांच्या कामकाजातील अडचणी आणि आवश्यक बाबींची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली.
अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्री योगेश कदम यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून टास्क फोर्सच्या कामकाजाची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टास्क फोर्सला बळकटी देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले.
राज्यभरात अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू असल्याबाबत बोलताना कदम म्हणाले की, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांना अधिक गती देण्यात आली आहे. या मोहिमेत केवळ अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरच नव्हे, तर त्यांचा पुरवठा करणाऱ्या पेडलर्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ड्रग्ज विक्रेत्यांचे संपूर्ण रॅकेट आणि त्यामागील साखळी उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राबाहेरही अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाया केल्या असून, त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा कारवायांना अधिक बळ मिळावे, यासाठी टास्क फोर्सच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य करणे हा आपल्या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, टायगर शॉपवरील हल्ल्याच्या घटनेबाबत विचारले असता, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिल्याचे कदम यांनी सांगितले. पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले




