
रत्नागिरीचे ज्येष्ठ कर सल्लागार सुहास बारटक्के यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरीक, ज्येष्ठ कर सल्लागार सुहास नथुभाई बारटक्के यांचे मंगळवार, दि. ७ जुलै रोजी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. रत्नागिरी शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात छोट्या-मोठ्या शेकडो व्यापार्यांसाठी त्यानी कर सल्लागार म्हणून अनेक वर्षे सेवा दिली. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, पुत्र सचिन, नितीन व श्रीनिवास, तसेच सुना, नातवंडे, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




