२ नोव्हेंबर रोजी ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’; नागरिकांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन


*रत्नागिरी, दि. २० जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ माहे नोव्हेंबर २०२६ साठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिन हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या लोकशाही दिनाकरिता तक्रार किंवा अर्ज दाखल करताना नागरिकांनी प्रथम तालुका पातळीवरील लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनात मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्यासच नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाद मागता येणार आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी आपला अर्ज विहीत नमुन्यात, १५ दिवस आधी दोन प्रतीत जिल्हा प्रशासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. वेळेत आणि योग्य पद्धतीने अर्ज सादर करून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button