
LPG सिलिंडरसाठी आजपासून नवीन नियम लागू, ही अट पूर्ण नसेल तर मिळणार नाही गॅस!
LPG Gas Update : आजपासून गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कुठे 62 तर कुठे 63 तर कुठे चक्का 71 रुपयांनी वाढलेले आहेत. त्यातच आता आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे.
LPG घरगुती गॅस सिलिंडर आता ग्राहकांना सहजा सहजी मिळणार नाही. त्यासाठीचे नियम आजपासून बदलले आहेत. तुमची एक चूक खूप महागात पडू शकते. तुम्ही अजूनही दुर्लक्ष केलं असेल तर आताच ही गोष्ट करून घ्या नाहीतर तुम्हाला भलीमोठी रक्कम घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोजावी लागू शकते. हा नियम काय आहे आणि तो नाही पूर्ण केला तर काय होऊ शकतं?
गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
१ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला असून, हजारो ग्राहकांच्या स्वयंपाकघरातील शेगडी विझण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही आपले बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केलेले नाही, त्यांची गॅस सिलिंडरची रिफिल बुकिंग करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यासंदर्भातील कडक निर्देश जारी केले आहेत. हा नियम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाआणि सामान्य घरगुती गॅस कनेक्शन या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना लागू असणार आहे.
१.८४ लाख ग्राहकांची नावे यादीतून बाद?
एकट्या रांची शहराचा विचार केल्यास तिथे सुमारे ८ लाख घरगुती गॅसधारक आहेत. त्यापैकी ७७ टक्के ग्राहकांनी ई-केवाईसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही सुमारे २३ टक्के म्हणजेच १.८४ लाख ग्राहकांनी ई-केवाईसी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून या १.८४ लाख ग्राहकांना सामान्य घरगुती सिलिंडरची बुकिंग करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
नियमात झाला बदल, तुम्ही तो पाहिला का?
अनेक ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर किंवा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार (Black Marketing) सहजरीत्या केला जातो. या काळाबाजाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि ‘व्हॅलिड’ (वास्तविक) ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी तेल कंपन्यांनी ई-केवाईसी अनिवार्य केले आहे.
उज्ज्वला आणि सामान्य ग्राहकांसाठी काय पर्याय?
उज्ज्वला योजना ग्राहक: गॅस बुकिंग पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना स्वतः इंडेन गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन करावे लागेल. ई-केवाईसी लटकलेले असल्यास त्यांना ५ किंवा १० किलोचा फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे ग्राहक: सामान्य ग्राहक घरबसल्या मोबाईलद्वारे ऑनलाइन ई-केवाईसी पूर्ण करू शकतात. किंवा बाजारभावाने विना-सब्सिडीचा ५/१० किलोचा FTL सिलिंडर घेऊ शकतात.
घरबसल्या मोबाईलवरून करा ई-केवाईसी
- मोबाईलमध्ये Indane OilOne ॲप आणि चेहऱ्याच्या ऑथेंटिकेशनसाठी Aadhaar FaceRD ॲप डाऊनलोड करा.
- गॅस कनेक्शनशी लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा. ई-केवाईसी पेंडिंग असणारा पर्याय निवडा.
- स्क्रीनवरील सूचनेनुसार आधार ऑथेंटिकेशन आणि फेस स्कॅन पूर्ण करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ॲपमध्ये ई-केवाईसी स्टेटस तपासून घ्या.
- जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल, तर गॅस सिलिंडर डिलिव्हरी देण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याकडून बायोमेट्रिक मशीनद्वारे ई-केवाईसी करून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी इंडेनच्या टोल-फ्री क्रमांक 1800-2333-555 वर संपर्क साधता येईल.



