कै. विनायक वासुदेव पेठे स्मृतीप्रीत्यर्थ २२ नोव्हेंबरला खुली बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरी : कै. विनायक वासुदेव पेठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पेठे परिवारातर्फे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे ‘कै. विनायक वासुदेव पेठे मेमोरियल ओपन रॅपिड चेस टूर्नामेंट २०२६’ या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटांतील बुद्धिबळप्रेमींसाठी खुली आहे.

कै. पेठे सर हे नामवंत बँकर, इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक आणि बुद्धिबळाचे निस्सीम चाहते होते. त्यांनी इंग्रजी अध्यापनातून अनेक विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी एकूण ३०,००० रुपयांचा पारितोषिक निधी असून खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी ६,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ४,५०० रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी ३,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. खुल्या गटात एकूण १५ क्रमांकांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

याशिवाय १५, १३, ११, ९ व ७ वर्षांखालील वयोगटांसह ज्येष्ठ नागरिक (५५+), महिला, अनरेटेड, १६ ते ३५ आणि ३६ ते ५५ वर्षे अशा विशेष गटांसाठीही आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धा १० मिनिटे + ५ सेकंद इन्क्रिमेंट या वेळेच्या नियंत्रणानुसार स्विस पद्धतीने आठ फेऱ्यांत खेळविण्यात येईल. प्रवेश शुल्क २५० रुपये असून स्पर्धेची वेळ सकाळी १० वाजता आहे. स्पर्धा रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

UPI नोंदणी : ८६६८५६६११६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button