खेडमध्ये २ सार्वजनिक, २१०० घरगुती गणपती बाप्पाला निरोप


खेड : गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणानंतर खेड शहर व परिसरातील गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी २ सार्वजनिक आणि सुमारे २१०० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये बसस्थानक खेड आणि नातुवाडी प्रकल्प, नातूनगर येथील दोन सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश होता.
गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जनस्थळी खेड विसर्जन कट्ट्याच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून गणेशभक्तांना विसर्जनासाठी आवश्यक मदत केली. त्यामुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत झाली.
दरम्यान, खेड नगरपरिषदेने विसर्जनस्थळी प्रकाशाची (लाईट) व्यवस्था केली होती. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. गणेशभक्तांनी निर्माल्य नदी अथवा जलस्रोतांमध्ये न टाकता नगरपरिषदेच्या संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द केले.
गणरायाला निरोप देताना भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button