
हायकोर्ट भरती परीक्षेत ऐनवेळी दिलेल्या सूचनांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला ,कच्च्या कामाला बंदी घातल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा
आज रत्नागिरी शहरातील फाटक एस्कूल येथे बॉम्बे हायकोर्टाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरती परीक्षेदरम्यान एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी कच्च्या कामाला (Rough Work) मनाई करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले,
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना दिली की, प्रश्नपत्रिकेवर किंवा उत्तरपत्रिकेवर कोठेही कच्चे काम (Rough Work) करायचे नाही. गणित आणि तर्कशास्त्राचे (Reasoning) कठीण प्रश्न सोडवण्यासाठी कागदाची गरज असताना अशा सूचना मिळाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले.
विद्यार्थ्यांची कैफियत
जेव्हा विद्यार्थ्यांनी याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांना “शांत राहा, प्रश्न विचारू नका” असे सांगून गप्प करण्यात आले. “गणिताचे पेपर कच्च्या कामाशिवाय कसे सोडवणार?” असा प्रश्न उपस्थित करत काही केंद्रांवर विद्यार्थी रडू लागले. ज्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रियेतून पेपरवर पेन्सिलने हिशोब करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही मनाई करण्यात आली असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे
या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. परीक्षेच्या नियमावलीत स्पष्टता नसल्याचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि बाधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला केवळ एकच तास वेळ होता. ६० मिनिटांत गणितं सोडवायची आणि ती पण कच्चं काम न करता? हे मानवी दृष्टिकोनातून अशक्य आहे. यामुळे मुलांचा वेळ वाया गेला आणि गोंधळामुळे सोपे प्रश्नही सुटले नाहीत.”
विशेष म्हणजे, हायकोर्टाने दिलेल्या अधिकृत प्रवेशपत्रावर कच्चे काम करण्याबाबत कोणतीही मनाई केलेली नव्हती. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे नियमावलीत नसतानाही ऐन वेळी पर्यवेक्षकांनी दिलेल्या या चुकीच्या सूचनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे याबाबत नेमका खुलासा होणे गरजेचे आहे. या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल आता पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत.” यातून मार्ग काढण्याची मागणी आता होत आहे या परीक्षेसाठी 600 विद्यार्थी बसले होते




