
दिवा-खेडसह दिवा-चिपळूण मार्गावरही मेमूच्या फेऱ्या
कोकण मार्गावर गणेशोत्सवात यंदाही दिवा- खेडसह दिवा – चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ०११५५/०११५६ क्रमांकाची दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशल ११ ते २७ सप्टेंबर यादरम्यान नियमितपणे धावेल. दिवा येथून सकाळी ७.१५ वा. सुटून त्याचदिवशी दुपारी २.३५ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात खेड येथून सायंकाळी ४ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.५० वाजता दिवा येथे पोहोचेल. १२ डब्यांच्या मेमू स्पेशलला निलजे, तळोजा, पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक स्थानकात थांबे आहेत.



