उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा दौरा


रत्नागिरी, दि. ११ ): महाराष्ट्राचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे गुरुवार, दि. १२ आणि शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ चे नियोजन:
आगीच्या घटनास्थळाची पाहणी (सकाळी ११:३० वा.): रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरातील जैन नगर येथे श्री महालक्ष्मी मिनी मॉल व परिसरात लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पालकमंत्री प्रत्यक्ष पाहणी करतील.

  • भेटीगाठी (दुपारी १२ ते २ वा.): जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव असेल.
    *जिल्हा आरोग्य विभाग आढावा बैठक (दुपारी २:१५ वा.): जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला जाईल.
    *जि. प. शाळांच्या पटसंख्येबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात (दुपारी ३:०० वा.): जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येबाबत जि. प. अध्यक्ष, शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडेल.
    *बचत गटांना पतपुरवठा बैठक (दुपारी ३:४५ वा.): महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना बँका व फायनान्स कंपन्यांकडून सुलभ पतपुरवठा मिळण्याबाबत अग्रणी बँक व्यवस्थापक आणि विविध बँकांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा होणार आहे. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय
    *पर्यटन व हॉटेल प्रकल्प आढावा (सायंकाळी ४:३० वा.): झाडगाव येथील ‘एक्सप्रेस इन फाईव्ह स्टार हॉटेल’ प्रकल्प आणि रिळ-उंडी येथील ‘क्लब महिंद्रा’ प्रकल्पाच्या उभारणीबाबत म.औ.वि.म. (MIDC) व महसूल अधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल.
    स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय
  • सिंधुरत्न समृद्ध योजना २.० (सायंकाळी ५:०० वा.): ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ च्या अनुषंगाने सिंधुरत्न कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडेल.
  • पत्रकार परिषद (सायंकाळी ५:३० वा.): क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिन’ व ‘जनजातीय गौरव दिन सप्ताह-२०२६’ (११ ते १८ नोव्हेंबर) साजरा करण्याबाबत पालकमंत्री पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील.स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय
    शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ चे नियोजन:
  • भेटीगाठी (सकाळी ९:०० ते १२:०० वा.): पाली (ता. जि. रत्नागिरी) येथील कार्यालयात भेटीसाठी वेळ राखीव असेल.
  • विविध गावांमध्ये भूमिपूजन सोहळे:
  • दुपारी १२ वाजता पानवल गावातील विकासकामांचे भूमिपूजन.
  • दुपारी १ वाजता कुंवारबाव गावातील विकासकामांचे भूमिपूजन.
  • दुपारी ३ वाजता नाचणे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन.
  • चिपळूण नगर परिषद नवीन इमारत भूमिपूजन (सायंकाळी ६ वा.): दुपारी ४:३० वाजता चिपळूणकडे प्रयाण करून, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना २०२५-२६ अंतर्गत चिपळूण नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button