भास्कर जाधव यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात फराळाचा गोडवा!

४३ वर्षांच्या राजकीय-सामाजिक प्रवासातील सहकारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती; आमदार शेखर निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी

चिपळूण : राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून मैत्री आणि माणुसकीची नाती जपण्याचा संदेश उबाठाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यातून देण्यात आला. दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित होणाऱ्या ‘फराळ स्नेहबंध’ या उपक्रमाचे यंदाही चिपळूण येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते.

भास्कर जाधव यांच्या ४३ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात विविध टप्प्यांवर साथ देणारे सहकारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी दिवाळी फराळाचा आनंद लुटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनीही या स्नेहमेळाव्याला उपस्थिती लावली. याशिवाय विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला.

राजकीय व्यासपीठावर विचारधारा आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या, तरी वैयक्तिक नात्यांमधील जिव्हाळा आणि आपुलकी कायम राहू शकते, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली. दिवाळी फराळाच्या निमित्ताने स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button