
वाशिष्ठी, शिवनदी पुलांवर लोखंडी जाळी
चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिवनदीवरील पुलांना सुरक्षेसाठी लोखंडी जाळी बसवा अशी मागणी उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. नद्यांमध्ये टाकला जाणारा कचरा, होणार्या आत्महत्या याचा विचार करता सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, शहरातील वाशिष्ठी व शिवनदीवरील पूल हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या काही काळापासून या पुलांवरून अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. नद्या कचरामुक्त राहण्यासाठी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी कायम प्रयत्न करीत असतात. असे असताना अनेक नागरिक पुलांवरून जाताना थेट नदीपात्रात प्लास्टिक, घरगुती कचरा आणि निर्माल्य टाकतात. यामुळे नदीचे पाणी दुषित होऊन पर्यावरणाचा मोठा र्हास होत आहे ही चिंतेची बाब आहे.




