जीजीपीएस गुरूकुल रमले बाप्पाच्या सेवेत

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रत्नागिरीतील जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुलात दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी बाप्पाचे आगमन झाले. विद्यार्थ्यांना आपल्या परंपरांविषयी माहिती व्हावी, त्यांविषयी त्यांच्यात आत्मीयता निर्माण व्हावी व प्रथा – परंपरांचा अर्थ समजून घेऊन त्यांनी सण साजरे करावेत या उद्देशाने दरवर्षी गुरुकुलात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी जी. जी. पी. एस. मध्ये शाळेच्या गेटापासून ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मूर्ती आणण्यात आली. ही मूर्ती प्रशालेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. रुद्र राजेंद्र गुरव याने तयार केली होती. तसेच, इयत्ता दहावीतील कु. गंधार नाखरेकर यानेही अजून एक गणेश मूर्ती तयार करून आणली होती.

मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नित्य उपासना व अथर्वशीर्षाचे पारायण केले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सामुदायिक आरत्या म्हटल्या गेल्या. प्रशालेचे काही माजी विद्यार्थीही यासाठी आवर्जुन उपस्थित होते.


यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गणपतीवरील गीतांवर नृत्ये सादर केली. प्रशालेतील शिक्षकांनी यासाठी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
हा संपूर्ण उपक्रम गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे, जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागप्रमुख सौ. अपूर्वा मुरकर तसेच पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. र. ए. सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button