सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कॅम्प भटवाडी येथे अति दुर्मिळ ‘कॅस्ट्रोज कोरल स्नेक’


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला-कॅम्प भटवाडी येथे अति दुर्मिळ ‘कॅस्ट्रोज कोरल स्नेक’ आढळून आला. सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्याचे सुरक्षित रेस्क्यू केले. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अमित बागवे यांच्या घराच्या अंगणात हा साप दिसून आला.कॅस्ट्रोज कोरल स्नेक हा अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचे दर्शन होणे हीच विशेष बाब मानली जाते. सर्पमित्र महेश राऊळ यांना २०२१ मध्ये प्रथमच या सापाचे रेस्क्यू करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये दोन वेळा या दुर्मिळ सापाचे रेस्क्यू त्यांनी केले. आता १३ सप्टेंबर रोजी भटवाडी येथे पुन्हा एकदा या सापाचे रेस्क्यू करण्यात आल्याने गेल्या सहा वर्षांत जिवंत कॅस्ट्रोज कोरल स्नेकच्या रेस्क्यूची ही चौथी घटना ठरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सापाची नोंद अत्यंत मोजकी आहे. वन्यजीव अभ्यासक हेमंत ओगले यांना यापूर्वी हा साप मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर जिवंत अवस्थेतील या सापाच्या नोंदी झाल्या असून, त्याच्या अस्तित्वामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या सापाच्या प्रजातीचा अभ्यास सर्पअभ्यासक हेमंत ओगले यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button