रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला तूर्तास ब्रेक


रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक संवर्ग पदोन्नती प्रक्रियेत कायदेशीर आणि प्रशासकीय संभ्रम निर्माण झाल्याने, या प्रकरणाचा शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून सुस्पष्ट अहवाल प्राप्त होईपर्यंत पुढील सर्व कार्यवाही तातडीने स्थगित ठेवण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना (सीईओ) लेखी पत्र पाठवून पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले आहे.
शिक्षक संवर्ग पदोन्नती प्रक्रियेमध्ये जिल्हा पदोन्नती समिती बैठकीच्या दिनांकास आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करणार्‍या सेवाज्येष्ठ शिक्षकांचा पदोन्नतीसाठी समावेश करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील अनेक शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button