
टिके-भातडेवाडी येथील प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथील प्रौढाने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. टिके, भातडेवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) सकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मंगेश कांबळे याने आजापरण आणि दारुच्या नशेत गळफास घेतला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.




