
कोकण रेल्वेची पहिली ’अमृत भारत’ एक्स्प्रेस; चिपळूणला थांबा मिळणार
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या पहिल्या ’अमृत भारत’ एक्स्प्रेसला चिपळूणसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
एरोड-उधना वन-वे स्पेशल (०६१९७) ही ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता एरोडहून सुटून १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता उधना येथे पोहोचणार आहे. चिपळूण येथे या गाडीचे सकाळी ८.५० वाजता आगमन होईल आणि ८.५२ वाजता ती प्रस्थान करेल. या गाडीला कारवार, मडगाव, थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा येथेही थांबे देण्यात आले आहेत. चिपळूणला अमृत भारतचा थांबा दिला हे स्वागतार्ह आहे. आता प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळूण येथे थांबा देण्यात यावा तसेच सर्वसामान्यांची रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.




