
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती.डी. वाय. पाटील यांनी राज्यात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.




