
युवा सेनेचे संगमेश्वरात भगवा खांद्यावर युवा सैनिक शेतकऱ्याच्या बांधावर अभियान
शेतकर्यांना फराळाचे वाटप करीत दिला, नैसर्गिक आपत्तीत लढण्यासाठी धीर

रत्नागिरी :
अल निनोमुळे कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी संकटात असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी भात कापणीत गुंतलेले आहेत. या शेतकर्यांची दिवाळीही चांगली व्हावी यासाठी युवासेनेच्यावतीने भगवा खांद्यावर युवा सैनिक शेतकऱ्याच्या बांधावर ही मोहीम राबवत शेतकर्यांना फराळाचे वाटप सुरु केले आहे. शेतकर्यांच्या खांद्यावर हात ठेवत या नैसर्गिक आपत्तीत युवासैनिक तुमच्यासोबत खंबीर उभा असल्याचा विश्वास शेतकरी वर्गाला दिला. संगमेश्वर तालुक्यात राबवलेल्या या उपक्रमाची शेतकरी वर्गांनेही प्रशंसा केली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व लांजाराजापूरचे आमदार किरणभैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या नेतृत्वात जिल्हयात हा उपक्रम राबवला जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील युवासेना पदाधिकारी सुधीर चाळके, प्रथमेश साळवी, विश्वास दसम, संदेश फडकले, प्रसाद मोरे, विराज साली, मोहन जवरत, तुरळ पोलीस पाटील संजय ओकटे आदी यावेळी उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये, वांद्री, कोळंबे, मानसकोंड, तुरळ, हरकरेवाडी या गावांमधील शेतकर्यांच्या बांधावर जात, त्यांच्या भागातील शेतीच्या स्थितीची माहिती युवासैनिकांनी घेतली. या शेतकर्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर देत, शिवसेना-युवासेना त्यांच्या पाठीशी असल्याच आश्वस्त केले. या शेतकर्यांना फराळाचे वाटप करीत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.




