कर्जत मधील वृक्षतोडी संदर्भात राष्ट्रीय हरीत लवादात याचिका दाखल! १७ डिसेंबरला याचिकेवर सुनावणी होणार!!

अलिबाग : कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी साई डोंगर परिसरात करण्यात आलेल्या वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. १७ डिसेंबरला लवादासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात गुजरात मधील टोरंट पॉवर कंपनीचा ३ हजार मेगा वॅट क्षमतेचा पंम्प स्टोरेज जलविद्यूत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वन जमिन हस्तांतरीत करण्यात आली आहे. तसेच वनजमिनींवरील ३२ हजार ४९० वृक्षांची तोड करण्यात वनविभागाने परवानगी दिली आहे. ज्यापैकी अडीच ते तीन हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

या विरोधात आता ॲड. सागर देवरे यांनी राष्ट्रीय हरीत लवादासमोर याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शसनाने वनजमिनींच्या हस्तांतरणाला दिेलेली मान्यता आणि ३२ हजार ४९० झाडे तोडण्याच्या आदेशाच्या वैधतेवर या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. हरीत लवादाने ही याचिका दाखल करून घेतली असून, प्रतिवादींना चार आठवड्यात त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते ॲड. देवरे यांनी दिली.

आक्षेप कोणते

वनहक्क कायद्या अंतर्गत आदिवासींचे हक्क निष्चित करण्यापुर्वीच वनजमिन वळतीकरणाचा निर्णय घेतल्याचा, स्थानिक ग्रामसभांची मंजुरी दिली नसतांना वळती करणाचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरण मंजूरी, वन मंजूरी आणि प्रत्यक्ष वृक्षतोड परवानगी देतांना कायदेशीर प्रक्रीयांचा अवलंब योग प्रकारे झाला नसल्याचा आक्षेप या याचिकेमध्ये करण्यात आले आहेत.

हा परिसर हा वेस्टर्न घाट परिसरात येतो. शेखरू हा राज्य प्राण्याचा अधिवास या परिसरात मुबलक प्रमाणात आढळतो, त्यामुळे वृक्षतोड करण्यापुर्वी वाईल्ड लाईफ परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र ती घेतली असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या संपुर्ण प्रक्रीयेत कायदेशीर प्रक्रीया पाळल्या गेल्या नाहीत हा आमचा मुख्य आक्षेप आहे. – ॲड. सागर देवरे, याचिकाकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button