दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहेत.

दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार असून, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान पार पडतील.

परीक्षांचे विषयानुसार सविस्तर तारीखनिहाय वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत संकेतस्थळावरून वेळापत्रक डाउनलोड करून त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button