दापोलीत रंगणार दिवाळी पाडवा सुरेल संगीत मैफिल कलाकथा इव्हेंट्स कडून दापोलीकरांना संगीतमय फराळ – स्वर दीपावली


मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायं. ७.०० वा.
स्थळ – सर विश्वेश्वरैया सभागृह
प्रवेश विनामूल्य

दापोलीतील विविध क्षेत्रातील मित्रमंडळींनी एकत्र येऊन कलाकथा इव्हेंट्स या आपल्या नवीन संस्थेच्या माध्यमातून दापोलीमध्ये विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या नवरात्री मध्ये दापोलीतील पहिला लाइव्ह बँड गरबा दांडिया या दोन दिवसांच्या अप्रतिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन त्यांनी केले. या कार्यक्रमाला दापोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मनमुराद आनंद लुटला.

कलाकथाच्या माध्यमातून या
दिवाळी मध्ये पाडव्याच्या दिवशी
स्वर दीपावली या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम म्हणजे दापोलीतील रसिकांसाठी संगीतमय फराळच असणार आहे. या कार्यक्रमामध्ये दोन नामवंत कलाकार रसिकांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहेत. यामध्ये लोकप्रिय अभिनेता आणि गायक अमोल बावडेकर ज्यांच्या बाजीराव मस्तानी, पांघरूण, भाई व्यक्ती आणि वल्ली, काकस्पर्श, सुंदर मी होणार, तुला जपणार आहे, प्रतिशोध, स्वामीनी, राधा ही बावरी या सारख्या अनेक गाजलेल्या कलाकृती आपल्याला माहीत आहेत.
अमोल बावडेकर यांच्या सोबत पद्मश्री पंडित सुरेश वाडकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची शिष्या सूर नवा ध्यास नवा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार आणि पार्श्वगायिका ईशानी पाटणकर अप्रतिम गाणी सादर करणार आहे.
या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यामध्ये दापोलीतील काही निवडक गुणी गायक, नर्तक आणि बाल कलाकार यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कलाकथा इव्हेंट्स मुळे एक उत्तम रंगमंच स्थानिक कलाकाराना उपलब्ध होणार आहे.
गाजलेले अभंग, भक्तिगीत, भावगीते, निवडक लोकप्रिय चित्रपट गीते आणि अप्रतिम नृत्याविष्कार यांनी सजलेला स्वर दीपावली हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता सर विश्वेश्वरैया सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. सर्व रसिक प्रेक्षकांसाठी ही सुरेल मैफल मोफत असून याकरिता कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.

तरी कृपया सर्व रसिकानी या अप्रतिम कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, तसेच या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकासाठी कलाकथा इव्हेंट्स च्या सहकाऱ्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन कलाकथा इव्हेंट्स कडून करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क
9930022529 7249070990

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button