दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रिम मदत; मंडणगडच्या शेतकऱ्याने मानले शासनाचे आभार


रत्नागिरी, दि. ७ ): जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम (आगाऊ) ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून वितरित करण्यात येत आहे.
आंबडवे (ता. मंडणगड) येथील शेतकरी दीपक जाकण यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकांचे अमाप नुकसान झाले आहे. अशा संकट काळात शासनाने तातडीने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत उपलब्ध करून दिली आहे. या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला असून मी शासनाचा मनापासून आभारी आहे.”
कमी पावसामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत असताना शासनाकडून मिळालेल्या या मदतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button